कोल्हापूर: कोल्हापूर 'गोकुळ' निवडणुकीच्या मतमोजणीतून अत्यंत महत्त्वाची व मोठी माहिती समोर येत आहे. मतमोजणीच्या सध्याच्या कलांनुसार राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे ५ उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
समविचारी आघाडीचे 'हे' ५ उमेदवार आघाडीवर: शशिकांत पाटील (चुयेकर), राहुल देसाई, अभिजित तायशेटे, अंजना रेडेकर, किसन चौगले.
सध्याच्या सुरुवातीच्या मतमोजणीत समविचारी आघाडीच्या या पाचही उमेदवारांनी सत्ताधारी महायुती पॅनेलच्या उमेदवारांवर मात करत महत्त्वाची आघाडी घेतली आहे.
हायव्होल्टेज लढत: नावेद मुश्रीफ विरूद्ध शशिकांत खोत!
गोकुळचे माजी चेअरमन नावेद मुश्रीफ आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यात याक्षणी अत्यंत अटीतटीची व काँटे की टक्कर सुरू आहे. प्रत्येक फेरीत दोन्ही उमेदवारांमधील मतांचे अंतर अवघ्या काही मतांवर आले असून या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

