कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध उत्पादक संघ निवडणुकीच्या मतमोजणीत मोठे राजकीय उलटफेर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत सर्वसाधारण गटातील सुमारे १६५० मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत देखील मोठ्या प्रमाणावर 'क्रॉस व्होटिंग' झाल्याचे समोर आल्याने दोन्ही बाजूंच्या अनेक दिग्गज नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. या क्रॉस व्होटिंगमुळे निकालाचे चित्र अधिकच चुरशीचे आणि अनपेक्षित बनले आहे.
असे असले तरी या अटीतटीच्या लढतीत महायुती प्रेरित पॅनेलचे सर्वसाधारण गटातील महायुतीचे सर्वच उमेदवार सध्या किरकोळ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या मतमोजणीत क्षणाक्षणाला आघाडी आणि पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. पुढील फेऱ्यांमध्ये क्रॉस व्होटिंगचा कोणाला फटका बसणार आणि कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

