Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या ४७ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ!



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व तालुक्याची आर्थिक वाहिनी असलेल्या हरळी (ता. गडहिंग्लज ) येथील 'आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना लि.' च्या सन २०२६-२७ च्या ४७ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.



कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित या शुभारंभ सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे होते. यावेळी व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण,  जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, शिवशंकर हत्तरकी, गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा चव्हाण, गडहिंग्लज नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांची प्रमुख उपस्थिती होती.



शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहकाराची बळकटी


कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी गळीत हंगाम सर्व दृष्टीने यशस्वी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सहकार क्षेत्रातील या कारखान्याचे योगदान अतुलनीय आहे. नव्या हंगामाच्या माध्यमातून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य व वेळेवर मोबदला मिळावा, कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट व्हावे, अशा भावना व शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.



यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व संचालक मंडळ, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.