
सांगली : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना श्रीकांत केसरकर व सोबत इतर मान्यवर.
गडहिंग्लज ( प्रतिनिधी) : महागाव येथील श्रीकांत केसरकर यांनी रील मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल महागावसह परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका व वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालये,सांगली यांच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून राज्यस्तरीय ' ठाई ठाई विठाई 'स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या राज्यस्तरीय रील मेकिंग स्पर्धेत श्रीकांत केसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सांगली येथे सत्कार करण्यात आला.
या अगोदर त्यांनी वाटर कलर पेंटिंग,ॲक्रिलिक पेंटिंग , पेनच्या साह्याने स्केच करून अनेक व्यक्ती ,निसर्ग ,मंदिरे,देवी, देवता यांची पेंटिंग व स्केच रेखाटले आहे.
