Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशात ११ व्या कृषी गणनेचा प्रारंभ

कृषी गणनेत डेटा संकलनासाठी प्रथमच स्मार्ट फोनचा होणार वापर


नवी दिल्‍ली (सौजन्य: पी.आय. बी):
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज देशात अकराव्या कृषी गणनेचा प्रारंभ केला.कृषी गणना दर ५ वर्षांनी केली जाते. कोरोना महामारीमुळे विलंबानंतर आता हाती घेतली जात आहे. कृषी जनगणनेचे प्रत्यक्ष कार्य ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणाले की, भारतासारख्या विशाल आणि कृषीप्रधान देशात या गणनेमुळे मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या राहणीमानात परिवर्तन घडवण्याबरोबरच लहान शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना  संघटित करणे, त्यांना फायदेशीर पिकांकडे आकर्षित करणे आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या ठोस पावलांचे फळ कृषी क्षेत्राला मिळत आहे. देश वेगाने डिजिटल शेतीकडे वाटचाल करत आहे. या गणनेत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची हीच वेळ आहे. कृषी गणनेचा व्यापक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. कृषी गणनेमुळे पिकांच्या मॅपिंगमध्येही योगदान मिळू शकते, जेणेकरून देशाला त्याचे फायदे मिळतील. तोमर यांनी केंद्रीय विभाग, राज्य सरकारे आणि संबंधित संस्थांना ही गणना पूर्ण निष्ठेनेने पार पाडण्यास सांगितले.

या प्रसंगी कृषिमंत्री तोमर यांनी  गणनेच्या कार्यान्वयन मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले आणि डेटा संकलन पोर्टल/अ‍ॅप सुरू केले. कृषी जनगणना हा तुलनेने सूक्ष्म पातळीवर विविध कृषी मापदंडांवर माहितीचा मुख्य स्त्रोत आहे.जसे की ऑपरेशनल होल्डिंगचा आकडा आणि क्षेत्र, त्यांचा आकार, वर्गवार वितरण, जमीन वापर, भाडेकरार आणि पीक पद्धती इ. कृषी गणनेसाठी प्रथमच डेटा संकलन स्मार्ट फोन आणि टॅबवर केले जाईल. जेणेकरून डेटा वेळेत उपलब्ध होईल. बहुतेक राज्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि सर्वेक्षणांचे डिजिटायझेशन केले आहे, ज्यामुळे कृषी गणनेच्या डेटाच्या संकलनाला गती मिळेल. डिजिटलाइज्ड भूमी अभिलेखांचा वापर आणि डेटा संकलनासाठी मोबाइल ॲप्स चा वापर देशातील ऑपरेशनल होल्डिंग डेटाबेस तयार करण्यास सक्षम करेल.

यावेळी कृषी गणना अंमलबजावणी प्रक्रिया आणि वेब पोर्टल आणि मोबाइल ॲपची ठळक वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.