![]() |
| गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात पल्लवी माने व सुयश देसाई यांचा सत्कार करताना डॉ.अनिल कुराडे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या बी.सी.ए विभागाचे विद्यार्थी पल्लवी माने व सुयश देसाई यांची विप्रो या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे व प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन लाभले. यावेळी बी.सी.ए विभागाचे प्रमुख प्रा. के.एस. देसाई, विना अनुदानित विभागाचे समन्वयक प्रा.आझाद पटेल, प्रा. बी.एस.पठाण, ग्रंथपाल संदीप कुराडे, प्रा. रवी खोत, प्रा. विक्रम शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

