Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी- हलकर्णी रस्त्याची तातडीने दुरुस्ती

"गडहिंग्लज बुलेटीन न्यूज" च्या वृत्ताची दखल

बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त

तेरणी : येथे रस्त्याची दुरुस्ती करताना.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
तेरणी - हलकर्णी मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्या संदर्भातील वृत्त "गडहिंग्लज बुलेटीन न्यूज" ने प्रसारित करताच याची तातडीने दाखल घेत बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली आहे. बांधकाम विभागाने तातडीने तत्परता दाखविल्याने नागरिकांसह वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे.

तेरणी - हलकर्णी मार्गावर तेरणी गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यासंदर्भात "गडहिंग्लज बुलेटीन न्यूज" ने वृत्त प्रसारित करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. याची दखल बांधकाम विभागाने तातडीने घेत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.