
बेंगळूर : वेदमूर्ती शिवकुमार हिरेमठ यांना वैदिक चतुर पुरस्कार प्रदान करताना श्री. मनीकंठ गुरुसिद्ध महास्वामीजी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बेंगळूर येथील महालक्ष्मी वैदिक संस्कृत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा "वैदिक चतुर" पुरस्कार तेरणी (तालुका गडहिंग्लज) येथील वेदमूर्ती शिवकुमार रामय्या हिरेमठ यांना देण्यात आला.
हा पुरस्कार बेंगळूर येथे झालेल्या पाचव्या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये कर्नाटक जंगम पुरोहित आर्चक या समाजातील ब्रँड अँबेसिडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. के.एन.शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर(बार्शी) चे म.नी.प्र१०८ श्री. मनीकंठ गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वेदमूर्ती शिवकुमार हिरेमठ यांना "वैदिक चतुर" म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वेदमूर्ती शिवकुमार हिरेमठ यांनी वैदिक (संस्कृत) चे ज्ञान प्राप्त केले आहेत. वैदिक शिवकुमार हिरेमठ यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
