Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जवान उदय घुगरे यांच्यावर उद्या जरळी येथे होणार अंत्यसंस्कार

🔘उत्तराखंड येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराने निधन

🔘सकाळी दहा वाजेपर्यंत पार्थिव जरळी येथे आणणार

🔘ग्रामस्थांसह नातेवाईक शोकाकुल


जरळी (वार्ताहर):
उत्तराखंड मधील पितोरागड येथे सैन्यात सेवा बजावत असताना जरळी ( ता. गडहिंग्लज) येथील जवान उदय महादेव घुगरे(वय ३०) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ही बातमी रविवारी सायंकाळी समजताच नातेवाईकांसह जरळी ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. जवान उदय घुगरे यांचे पार्थिव उद्या (बुधवार दिनांक २०) रोजी सकाळी दहा वाजता जरळी येथे आणण्यात येणार आहे. शोकाकुल नातेवाईकांसह ग्रामस्थ पार्थिवाच्या प्रतीक्षेत आहेत.अंत्यसंस्काराची तयारी ग्रामस्थांसह प्रशासनाने सुरू केली आहे. 

जवान उदय घुगरे यांना लहानपणापासून भारतीय सैन्यात भरती होण्याची खूप इच्छा होती. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर २०१५ मध्ये बेळगाव येथील मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये ते भरती झाले होते. लखनौ येथे त्यांनी आर्मी मेडिकल कोअर मध्ये प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग दिल्ली तर दुसरी पोस्टिंग उत्तराखंड मधील पितोरागड येथे झाली होती. येथे सेवा बजावत असताना हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. २०१८ मध्ये त्यांचा विवाह गीता यांच्याशी झाला असून त्यांना दीड वर्षाचा मुलगा आहे. जवान उदय यांचे वडील महादेव घुगरे हे माजी सैनिक असून त्यांनी सैन्यात १९ वर्षे सेवा बजावली आहे.

जवान उदय घुगरे यांचे प्राथमिक शिक्षण जरळी  शाळेत, माध्यमिक शिक्षण जरळी हायस्कूलमध्ये तर पदवीचे शिक्षण डॉ.घाळी महाविद्यालयात झाले आहे. त्यांचे पार्थिव उद्या जरळी येथे सकाळी दहा वाजेपर्यंत आणण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.