Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उत्कृष्ट कार्याबद्दल केडरचे सहाय्यक सचिव गुरुगोंडा पाटील यांचा मुगळीत सत्कार

मुगळी : केडरचे सहाय्यक सचिव गुरुगोंडा पाटील यांचा सत्कार येथील महात्मा गांधी वाचनालय, अभ्यासिका केंद्र मार्फत करण्यात आला. यावेेेळी उपस्थित मान्यवर.

जरळी (वार्ताहर):
 उत्कृष्ट कार्य, वसुली आणि प्रशासकीय मदत केल्याबद्दल केडरचे सहाय्यक सचिव गुरुगोंडा पाटील यांचा सत्कार मुगळी (तालुका गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी वाचनालय, अभ्यासिका केंद्र मार्फत करण्यात आला. 

 गुरुगोंडा पाटील यांनी २०२१-२२ साली विविध सेवा संस्थाना १०० टक्के वसुली करण्यासाठी मदत करून उत्कृष्ट कार्य केले आहे. याबद्दल त्यांचा मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  

सत्काराला उत्तर देताना गुरुगोंडा पाटील म्हणाले, मुगळी  वाचनालयमार्फत माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन.  वाचनालयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष सुरेश पाटील, कार्यवाह बी. जी.स्वामी, सचिव आपासो जाधव,विजय महाडिक, आपासो कदम, ईश्वर हुल्लोळी, सागर आरबोळे, शंकर माने, गजानन कांबळे यांच्यासह वाचक उपस्थित होते. स्वागत ग्रंथपाल के. डी. धनवडे यांनी केले.आभार श्रीपाद स्वामी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.