
महादेव भकरी लता गुरव
जरळी (वार्ताहर): गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटना अध्यक्षपदी महादेव भकरी तर उपाध्यक्षपदी लता गुरव, खजिनदारपदी शिवाजी मांगले तर सचिवपदी सचिन होरा यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्षा सुषमा पोवार, संतोष नलवडे, सुंधा सावंत, भिमापा वाळकी, सुभाष खोत, वंदना तोडकर, राजु गुरव, सोनल पाटील, प्रतापराव घाटगे यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचा सत्कार करण्यात आला.स्वागत सचिव सचिन होरा यांनी केले.आभार अध्यक्ष महादेव भकरी यांनी मानले.
