![]() |
| मुगळी: भावगीत व भक्तीगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या कल्लेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. |
जरळी (वार्ताहर):मुगळी (तालुका गडहिंग्लज) येथील पं.पु. गुरुवर्य गुरलिंगया स्वामी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त न्यु इंग्लिश स्कूल शाळेमार्फत भावगीत व भक्तिगीत स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कलेश्वर हायस्कूल भडगाव, द्वितीय क्रमांक पार्वती कांबळे, तृतीय क्रमांक शर्वरी भोसले, उत्तेजनार्थ चैतन्या सुतार यांनी यश मिळवले. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सुरवातीला प्रतिमा पुजन मुख्याध्यापिका विद्यादेवी लोहार यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिक्षण कमिटी अध्यक्ष यशवंत भोसले, प्रशांत कडलगे, निजगुणी स्वामी, बी.जी. स्वामी, रामया स्वामी, मुकुंद शिंदे, सुनील सागर, प्रविण कंदगल, सुनिल कांबळे, स्मिता खडकेकर, महेंद्र रणनवरे, परशुराम महाजन, दत्तात्रय संगममित्र, अनिल शिंत्रे यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी, पालक उपस्थित होते. परिक्षक म्हणून संभाजी तराळ,जरळी व श्री.मुगिरे, नुल यांनी काम पाहिले. स्वागत मुकुंद शिंदे यांनी केले.

