
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात बी.कॉम तृतीय वर्षाच्या शुभेच्छा समारंभात मार्गदर्शन करताना प्रा. किसनराव कुराडे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.
गडहिंग्लज ( प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालयात बी.कॉम तृतीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे, लेखापरीक्षक सुरेश पोवार, एस. पी. थरकार उपस्थित होते.
स्वागत व प्रस्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डी.पी. खेडकर यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. महेश चौगुले व डॉ. सागर पोवार लिखित बी.कॉम भाग दोनच्या "कार्पोरेट अकाउंटिंग" या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात भरपूर वाचन करणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. जीवनात कोणतेही काम मनापासून करावे तरच आपल्या जीवनात यशस्वी होता येते असे स्पष्ट केले. लेखापरीक्षक सुरेश पोवार यांनी समाजाशी एकरूप झालेल्या शिवराज महाविद्यालयाने रयतेची मुले शिकावीत व त्यांच्या जीवनात बदल घडावा यासाठी शिवराजचा हा ज्ञानयज्ञ आजही प्रा. कुराडे यांनी प्रज्वलित ठेवला आहे असे स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील स्क्रीन टाईम कमी करून आयुष्य घडवण्याचा ध्यास घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी जगण्याची जीवनकला शिकविणारी विद्या शाखा म्हणजे वाणिज्य होय. या शाखेची पदव्युत्तर शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या शाखेतून विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविण्याची संधी आहे. या संधीतून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला दिशा दिली पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, महेश चौगुले, प्रा.सागर पोवार आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भक्ती सुतार, नीरज शहा, अक्षता कोनुरी, ऋतुजा थोरात आदि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, डॉ. डी.जी. चिघळीकर, श्री. नंदनवाडे गुरुजी, प्रा. बी.एम. जाधव, प्रा. बियामा वाटंगी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन सायली नाईक, प्रतीक कोल्हापुरे यांनी केले. आभार प्रा.नाझिया बोजगर यांनी मानले.
