
गडहिंग्लज : निखिल जोशी व समेध पाटील यांचे अभिनंदन करताना संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम. कदम व इतर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या बी.कॉम भाग 3 चे विद्यार्थी निखिल नंदकुमार जोशी व समेध सुधाकर पाटील हे सी.ए.इंटर परीक्षा उत्तीर्ण झाले. ह्या दोन्ही विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस. एम.कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. दीपक खेडकर, डॉ. महेश चौगुले, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी प्रा.विक्रम शिंदे उपस्थित होते.
शिवराज महाविद्यालयाचे विद्यार्थी निखिल जोशी, समेध पाटील सी.ए. इंटर परीक्षा उत्तीर्ण
July 25, 2022
0
