![]() |
| तेरणी : मुख्य चौकात आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने ध्वजारोहण करताना सरपंच मोसिम मुल्ला, माजी सैनिक महेंद्र तेगनाळे. |
येथील बस स्टँडवरील मुख्य चौकात आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. हे ध्वजारोहण सरपंच मोसीम मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अशोक रावसाहेब देसाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व आजी,माजी सैनिकांनी शिस्तबद्धरीत्या परेडच्या माध्यमातून ध्वजाला सलामी दिली. यावेळी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी👇 येथे क्लिक करा
दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, आरोग्य उपकेंद्र यासह गावातील विविध दूध संस्था, पतसंस्था, सेवा संस्था यांनी ध्वजारोहण केले.
अशोक देसाई हायस्कूल, मराठी विद्या मंदिर, उर्दू विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. दरम्यान, बस स्टँड परिसरात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करत आपली कला सादर केली. विविध देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.











