गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. शिक्षण समुहात संस्थापक ॲड.आण्णासाहेब चव्हाण तर प्रधान कार्यालयाजवळील ध्वजारोहन सचिव ॲड.बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांनी अमृतमहोत्सवानिमित्य शिक्षण समुहातून रॕली व घोषणा देत उत्सव साजरा केला. दरम्यान, महाविद्यालय व हॉस्पिटलजवळ विविध सामाजिक व चळवळी पथनाट्य सादर करीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रांगोळी स्पर्धा झाल्या. यासाठी प्रतिसाद मिळाला. विजेत्यांचा मान्यवराच्या हस्ते गौरवण्यात आला. यावेळी डॉ यशवंत चव्हाण, डॉ.संजय चव्हाण, डॉ.प्रतिभा चव्हाण, डॉ.सुरेखा चव्हाण, प्रा.अजिंक्य चव्हाण, डॉ.मंगल मोरबाळे, डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. एस. एच. सावंत, डॉ. अन्सार पटेल, प्रा. डी. बी. केस्ती, रजिस्टा


