Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'मित्रांगण'कडून गडहिंग्लजमध्ये देशभक्तीचा जागर

🔘" माँ तुझे सलाम " गीतांचा कार्यक्रम विशेष सन्मान सोहळा उत्साहात

🔘देशभक्तीपर गीतांनी श्रोते झाले मंत्रमुग्ध

🔘चिमुरड्यांनी सादर केलेल्या गीतांना 'वन्समोअर'ची दाद

गडहिंग्लज: येथील मित्रांंगण परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात विशेष सन्मान सोहळ्याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करताना उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.
                                                       (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मित्रांगण परिवार गडहिंग्लज यांचे मार्फत " माँ तुझे सलाम " या कार्यक्रमांतर्गत विशेष सन्मान सोहळा व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व इतर मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक कै.मारुती आप्पाजी काळे (रा.नूल) यांच्या पत्नी श्रीमती आक्काताई मारुती काळे यांचा व सलग २७ वर्षे राष्ट्रीय सण मोठया उत्साहात साजरे करणे व ध्वजारोहण करणे याबद्दल तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पण प्रसिध्दी पासून दूर असणारे सामाजिक कार्यकर्ते ताहिर गफुरसो मकानदार यांचा, कारगील युध्दात यशस्वी सहभागी झालेले सरोळीचे सुपुत्र सुबराव पाटील यांचा विशेष सन्मान प्रांताधिकारी वाघमोडे यांचे हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास  माजी सैनिक धोंडीबा हळदकरमाजी उपनगराध्यक्ष दत्ताजीराव रगे, करंबळीचे सरपंच प्रविण माळी, उद्योजक सुनील चौगुले, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सलवादे, पंचायत समिती माजी उपसभापती विद्याधर गुरबे , गडहिंग्लज शिवसेना शहर प्रमुख संतोष चिक्कोडे, गडहिंग्लज भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र तारळे,  प्रा.सदानंद वाली,  राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा संघटक अजित बंदी, शिवराज विद्या संकुलचे दिग्वीजय कुराडे, अमन यु सर्कलचे अध्यक्ष हबीब मकानदार, कडगांवचे सरपंच संजय बटकडली, चंद्रकांत सावंत, विठ्ठल भमानगोळ, प्रितस कापसे, माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, माजी नगरसेविका शारदा आजरी उपस्थित होते.

अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दत्ताजीराव बरगे यांचा सत्कार व सेवानिवृत्त कॅप्टन धोंडीबा  हळदकर यांचा  ७४ वा वाढदिवस प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोड व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 यानंतर तब्बल तीन तास चाललेल्या देशभक्तीपर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरवात 'ऐ मेरे वतन के लोगो' या गीताने झाली. राजेंद्र भुईंबर  व गीता पाटील यांनी सादर केलेल्या "आय लव्ह माय इंडिया "या गीताला उपस्थित श्रोत्यांनी 'वन्समोअर' ने दाद दिली. तर अनुष्का प्रविण माळी या चिमुरडीने 'देस रंगीला रंगीला' या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. देव्यां प्रितम कापसे या ६ वर्षीय चिमुरडयाने सादर केलेल्या 'नन्ना मुन्ना राही हूँ' या गीतांना प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. तर चंद्रकांत सावंत यानीही स्वरचीत अनामवीरा ही कविता सादर केली.

कार्यक्रमाची सांगता "जिंदगी मौत ना बन जाये" या गीताने करण्यात आली. "माँ तुझे सलाम " या विशेष कार्यक्रमासाठी हबीब मकानदार, राजेंद्र भुईंबर, मज्जिद किल्लेदार, किरण म्हेत्री, फिरोज मणेर, विशाल रोटे, मोहसिन अत्तार, हिदायत नाईकवाडे, भारत खोत, गौरव गच्ची, सुनील कांबळे, सौ.सरीता कांबळे, सौ,गीता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व मान्यवरांचे स्वागत युवराज रगे यांनी केले तर आभार कुमार पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.