![]() |
| तेरणी : हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी महिला. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (तालुका गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
"आजादी का अमृतमहोत्सव" अंतर्गत हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मोबाईलचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच विधवांची ओटी भरणे, तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत महिला सदस्य,आरोग्य सेविका, शिक्षिका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






