गडहिंग्लज( प्रतिनिधी): गिव्ह विंगस फाउंडेशनच्या सदस्यांनी गिजवणे येथील मूकबधिर निवासी शाळेला भेट देत दिवसभर या विद्यार्थ्यांच्या सहवासात राहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. त्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्यामध्ये एक नवी उमेद जागवली. फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या टीम मध्ये एसजीएम येथील बीए एम.एस मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
१५ ऑगस्ट रोजी टीम मधील सर्व सदस्य मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी चित्रकला, हस्तकला, विविध स्पर्धा या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजन घडवून आणले. यासाठी लागणारे सर्व साहित्य फाउंडेशनच्या मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आले.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे👇 क्लिक करा
या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
हा उपक्रम डॉ.महेश पाटील, ग्रुप ॲडमिन सार्थक खांडेकर, ऋषभ बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला.
यावेळी बीए एम.एसचे विद्यार्थी सुदर्शन चौगुले, आनंद पाटील, हर्षल महात्मे, प्रताप चाटे, मृदुल मक्रमपुरे, संकेत कुंभार, श्वेताली कदम, ओमकार खडेकर, प्रफुल्ल लोंढे, सोहेल मुल्ला, सोनाली गडे, सिमरन मगदूम, आकांक्षा दाहुळे, आतिश कुंडेकर, तुषार कोरडे, सोहम दोशी, निखिल यडगे, अभिजीत चोरगे, प्रत्यूष कांबळे,अनस पिंजरिमोस, जहिद तसीलदार, योगेश लोंगटे, गौरव बर्गे, नितेश भोयर, निलेश गोपणार, रोहन नागे, दर्शन गुरव, बुद्धभूषण कुचेकर, श्याम थोरात, सोनाली गावडे, प्रीती यादव, ज्ञानेश्वरी तुपे, निशिगंधा वेरूळकर, प्रतीक्षा पाटील, प्रतीक्षा अपेत, वैष्णवी मोरे, मनीषा होंडे, नीता जगदाळे, ऐश्वर्या देशमुख, प्रसाद गुरव, अर्जुन पाटील, विनायक घोरपडे, प्रसाद राठोड, विक्रम सोमवंशी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल मूकबधिर निवासी शाळेच्या वतीने या सर्वांचे आभार मानण्यात आले.









