Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"हर घर तिरंगा" सर्टिफिकेट मिळवा अवघ्या दोन मिनिटात


नवी दिल्ली :
अवघा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करत आहे. या उत्साहाचा आनंद "हर घर तिरंगा" मुळे आणखीच द्विगुणीत झाला आहे. ह्या आनंदाला आणखी द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारने प्रत्येकाला हर घर तिरंगा सर्टिफिकेट देण्याची सोय ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून केली आहे. तिरंगा फडकवल्यानंतर प्रत्येक नागरिकाला गुगलवर जाऊन सर्टिफिकेट मिळविता येणार आहे. यासाठी सरकारने एक वेबसाईट तयार केले आहे. तर पाहूया हे सर्टिफिकेट गुगलवर जाऊन कसे मिळवायचे

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर htttps://harghartiranga.com या वेबसाईटवर जावयाचे आहे. तिथे PIN A FLAG या पर्यायावर क्लिक करावयाचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पिक्चर टाकायचा आहे. हे केल्यानंतर आपले नाव व मोबाईल नंबर टाका. (प्रोफाइल पिक्चर न टाकताही  तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता) त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या तिरंग्याची स्थिती चिन्हांकित करा. त्यानंतर तुमचा पिन कोड लोकेशन सिलेक्ट करून तुमचे प्रमाणपत्र तयार केले जाईल. त्यानंतर तुम्ही हे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.