![]() |
| तेरणी : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अक्षय घोरपडे. यावेळी सरपंच मोसीम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे, नागराज पाटील, ग्रामविकास अधिकारी निवृत्ती कोंडुसकर. समोर उपस्थित शेतकरी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त ग्रामपंचायत तेरणी व तालुका कृषी अधिकारी,गडहिंग्लज यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला.
यावेळी ग्रिनिटीचे सी.ओ.ओ अक्षय घोरपडे यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांशी चर्चा व त्यांच्या शंकांचे समाधान केले.
यावेळी सरपंच मोसीम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे, नागराज पाटील, अर्जुन कांबळे, ग्रामविकास अधिकारी निवृत्ती कोंडुसकर, कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक एच. टी. सिताप, कृषी सहाय्यक विलास गुजर,अमित शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



