Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हरळीत विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

हरळी बुद्रुक : आजी-माजी सैनिक सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ.

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
हरळी बु।। येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शेतकरी मेळावा, महिला मेळावा,विविध विषयांवरील व्याख्याने, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,प्रभातफेरी, वृक्षारोपण अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह गावातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले.त्याचबरोबर गावात घरोघरी जाऊन तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले आणि हरघर तिरंगा अभियानाची महिती दिली.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान अनुक्रमे माजी सैनिक विजय मोर्ती, नामदेव गुरव आणि सरपंच निलम कांबळे या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महालक्ष्मी मंदिर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील आजी-माजी सैनिकांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वेच्छानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सौ. तीबीले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी  सरपंच निलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, पोलीस पाटील रेणुका परीट,ग्रामपंचायत सदस्य बळवंत गुरव, शिरीष हरळीकर, मेघा पाटील, नीलिमा डवरी, छाया खवरे, अंजना साटपे, यांच्यासह शामराव हरळीकर,हिंदुराव नौकुडकर, काकांना बैरागी,अनिल मुरूकटे,बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब घेवडे, बाबुराव भालेकर, सुहास पताडे, संदीप खवरे,शिवाजी पाटील,नारायण कांबळे,विश्वास माळी, शशिकांत परीट, राहुल पताडे,महादेव पोवार, पांडुरंग शिंदे,अमर कांबळे किरण पाटील,रणजित गोजारे, सुरेश साटपे,नेताजी जाधव,अनिल मोर्ती,पांडुरंग होडगे, बजरंग मुसळे,राजाराम पाटील,पांडुरंग पताडे,नामदेव पाटील,विकास पाटील,रामा सुतार, संदीप होडगे,जी.बी.पाटील , रमेश कोकितकर, रामचंद्र होडगे,सुरज होडगे यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामसेविका वैशाली कुरळे, विक्रम मुरुकटे,चेतन हरळीकर, हणमंत चिमनापगोळ, मारुती गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.