Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न


गडहिंग्लज
(प्रतिनिधी) :  येथील शिवराज महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धुळे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारीस उपस्थित होते.

 कॅडेट ऋतुजा तोरस्कर यांनी 'ए मेरे वतन के लोगो' हे देशभक्तीपर गीत सादर केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी एन. सी. सी. कॅडेटना प्रतिज्ञा दिली. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी मार्गदर्शन केले व भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालयात तीन दिवस विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या विविध चळवळीबाबत सात दिवस व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. क्रांती ज्योत व तिरंगा दौड काढण्यात आले. शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. शहीद जवान उत्तम भिकले यांच्या वीरपत्नी सुगंधा भिकले यांचा सन्मान करण्यात आला. एम.एस.ई.बी.चे अधिकारी श्री. दांगट यांच्या हस्ते महाविद्यालयातील एन. सी. सी. चे कॅडेट अथिलेश शिंदे, आकाश मोरबाळे, श्रीहरी सबनीस यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या 'अविष्कार' संशोधन स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल सौरभ पाटील (बी.एस्सी.भाग दोन) या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी. एम. एस. ई. बी. चे अधिकारी श्री. दांगट यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष के.जी.पाटील, जे. वाय. बारदेस्कर, अँड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, संस्थेचे श्री. पेडणेकर, बसवराज आजरी, संस्थेचे अन्य पदाधिकारी,मान्यवर, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, एन. सी. सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.राहुल मगदूम, शिवराज विद्या संकुलातील प्राध्यापक, शिवराज इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे, माळी हायस्कूलचे मुख्याध्यापक  संजय भांदगरे , श्री.नंदनवाडे, विद्या संकुलातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.