गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री. हाळलक्ष्मी सार्वजनिक मोफत वाचनालयात वार्षिक सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे यांनी स्वागत व वार्षिक आढावा घेतला. यावेळी इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी सलोनी रामचंद्र रोटे, सानिया मनोहर रोटे, क्रांतीका सदानंद सूर्यवंशी, प्रतीक विजय सूर्यवंशी, साहिल नंदकुमार मोरे, निखिल संजय मोरे, ओमकार मारुती माने, श्रेयस संतराम पवार, अनिकेत विलास रोटे, बालाजी संजय कांबळे, साहिल प्रकाश कुंभार, सारिका सदानंद सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आदर्श ग्रंथ वाचक सौ. पुनम विक्रांत मोरे व नियमित वाचक नंदकुमार दत्तात्रय मोरे तसेच सांगली येथील पोस्ट पोस्ट कार्यालयातून सेवानिवृत्तीबद्दल अशोक रामचंद्र खोराटे, गोकुळ दूध संघातून सेवानिवृत्तीबद्दल बाळासो नाना देवेकर यांचा सत्कार आनंदा खेडेकर, संतराम पवार, प्रकाश पवार, राजेंद्र वडगावे, अण्णासो रोटे, डी.वाय. रामपुरे, बाळासाहेब वडदारे, संजय नारायण रोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन दयानंद मोरे, प्रवीण शिंदे, सौ.विमल अडावकर, सौ.कमल कुंभार, कल्पना रोटे, ग्रंथपाल वंदना तोडकर, प्रकाश मोरे यांनी केले.आभार प्रा.आर.बी.कांबळे यांनी मानले.



