![]() |
| तेरणी : विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना सरपंच मोसीम मुल्ला, उपसरपंच अक्काताई हजेरी, सदस्य करवीर उथळे. यावेळी उपस्थित बाळासाहेब निंबाळकर व इतर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तेरणी (तालुका गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटात संस्कार आनंद सुतार, लहान गटात सुशांत शिवाजी यरनाळे, रांगोळी स्पर्धेत मोठ्या गटात निकिता अर्जुन कांबळे तर लहान गटात भक्ती निंगाप्पा अलदाळे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : चित्रकला स्पर्धा मोठा गट- प्रथम संस्कार आनंद सुतार, द्वितीय वेदिका रवींद्र मुंगुरवाडी, तृतीय झहीर नूर साबखान, उत्तेजनार्थ साईराज राजेंद्र नावलगी, लहान गटात प्रथम सुशांत शिवाजी यरनाळे, द्वितीय वल्लरी विलास भोगाणे, तृतीय दर्शन दुंडाप्पा मलकानावर, उत्तेजनार्थ शिवतेज करवीर मांगले, रांगोळी स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक निकिता अर्जुन कांबळे, द्वितीय ऐश्वर्या रमेश पुजारी, तृतीया प्रतीक्षा सुरेश सुतार, उत्तेजनार्थ सानिका संभाजी सुतार तर लहान गटात प्रथम क्रमांक भक्ती निंगाप्पा अलदाळे, द्वितीय सरस्वती मारुती हंजी, तृतीय प्रतीक्षा प्रकाश नाईक, उत्तेजनार्थ सिद्दिका गौस मुल्ला या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना सरपंच मोसीम मुल्ला, उपसरपंच अक्काताई हजेरी, सदस्य करवीर उथळे, बाळासाहेब निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विविध कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम व विद्यार्थी सत्कार कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.यावेळी गावातील सर्व देणगीदारांचे, शाळा, आरोग्य विभाग, अंगणवाडी, पोस्ट ऑफिस, तलाठी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सरपंच मोसीम मुल्ला यांनी विविध कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल व सहकार्यबद्दल सर्वांचे कौतुक करून आभार मानले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक रमजान अंकली यांनी केले.

