Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुस्तकांवर प्रेम करा, समाजातील माणसं वाचता येतील !

🔘बसापा उमनहटी यांचे प्रतिपादन

🔘मुगळीच्या महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांची जयंती साजरी

मुगळी: येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना स्टेट बँकेच्या गडहिंग्लज शाखेचे बसापा उमनहटी. यावेळी उपस्थिती इतर मान्यवर.

जरळी(वार्ताहर):
आज टिव्ही, मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चाललीआहे. युवा वर्गाचा वाचनाकडील ओढ कमी झाल्याचे दिसून येत आहे. वाचनाने माणूस घडतो. पुस्तकांवर प्रेम केल्यास समाजातील माणसे आपल्याला वाचता येतात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसाठी ग्रंथालये ही तितकीच महत्त्वाची आहेत असे प्रतिपादन गडहिंग्लज येथील स्टेट बँकेचे  बसापा उमनहटी यांनी केले.

मुगळी येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांच्या १३० वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना श्री उमनहटी म्हणाले ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांनी ग्रंथालये सुरु केली. ती ग्रंथालये आजच्या तरुण पिढीसाठी फार महत्वाचे आहेत.वाचनाने माणसाचे  विचार प्रगल्भ होतात. त्यासाठी पुस्तकावर प्रेम केले पाहिजेत तरच आपल्याला माणसं वाचता येतील व जग कळेल. वाचनाने माणसातील अज्ञान व गुलामगिरी नष्ट करता येते.

सुरवातीला रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सौनिंकाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास  कार्यवाह बी.जी.स्वामी, तुकाराम महाडिक, सुरेश धनवडे,  सुरेश पाटील, आपासो जाधव, ईश्वर हुलोळी, विजय महाडिक, किशोर मुसळे, बाळापा माने, आपासो कदम, सागर आरबोळे, शंकर माने, गजानन कांबळे,  के.डी.धनवडे, श्रीपाद स्वामी, योगेश धनवडे, गौरव भोसले यांच्यासह वाचक,सभासद उपस्थित होते. स्वागत ए.बी.जाधव यांनी केले.आभार ईश्वर हुल्लोळी यांनी मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.