Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हाळलक्ष्मी मंदिर परिसरातील अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा

🔘डॉ. पूनम बेळगावकर यांनी केले महिलांना मार्गदर्शन

गडहिंग्लज: येथील हाळलक्ष्मी मंदिर परिसरातील अंगणवाडीत आयोजित स्तनपान सप्ताह कार्यक्रम प्रसंगी डॉ. पूनम बेळगावकर, अंगणवाडी सेविका वंदना साबळे यांच्यासह महिला.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हमारा आयुष, हमारा स्वास्थ' या उपक्रमांतर्गत गडहिंग्लज येथील हाळलक्ष्मी मंदिर परिसरातील अंगणवाडीत महिलांसाठी स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या डॉ. पूनम बेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 प्रारंभी अंगणवाडी सेविका वंदना साबळे यांनी स्वागत केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. बेळगावकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. 

या कार्यक्रमास जागृती पाटील, करिष्मा पाटील, स्मिता शिंदे, माधुरी शेवाळे, प्रियंका शिंदे, अश्विनी हुवाणी, सुप्रिया भोसले, संध्या होडगे, शुभांगी बेनके, कल्पना रोटे, कविता पाटील, अंजना शिंदे, आशा पोवळ  यांच्यासह इतर उपस्थित होते. आभार सुवर्णा खपले यांनी मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.