
गडहिंग्लज: येथे समरजितसिंह घाटगे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढलेला निषेध मोर्चा.(छाया: मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी किरणराव कदम,शारदा आजरी, रामगोंडा पाटील,उदयराव जोशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇 येथे क्लिक करा
