गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालयाच्या 'आम्ही शिवराजीयन' पाक्षिकाच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकासाठी लेखन साहित्य पाठविण्याचे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव 'आम्ही शिवराजीयन' चे कार्यकारी संपादक डॉ.अनिल कुराडे यांनी केले आहे.
चालू वर्षीच्या
अंकामध्ये समाजातील
अलुतेदार व बारा बलुतेदार
यांच्या कष्टप्रद जगण्याला
न्याय देण्यासाठी समाजात
आजही उपेक्षित राहिलेल्या
या घटकाची माहिती
देणारे लेखन, त्यांच्यातील
कला-कुसर, विविध
लोकरूढी, सण-उत्सवाच्या
माध्यमातून जपली जाणारी
बांधिलकी, रिती-रिवाज,
जगण्याच्या प्रवाहातील
समाजशीलता या सर्वच गोष्टींवर
प्रकाश टाकणारे बारा बलुतेदार
व अलुतेदार अशा अठरा
पगड जातीचा समूह आजही समाजात
आपल्यापरीने कशा प्रकारे
योगदान देत आहे. यावर स्पष्टपणे लिहिणारे यासह समाजातील उपेक्षित
अलुतेदार व बलुतेदार यांच्या
जीवन प्रवासावर समाजशील लेखन
असणारे, लेखन साहित्य
दिवाळी अंकासाठी मागविण्यात
येत आहे. या दिवाळी
अंकासाठी आवश्यक लेखन साहित्य
प्राचार्य, शिवराज
महाविद्यालय गडहिंग्लज
किवा amhishivrajiyan1@gmail.com
अथवा
सतीष पाटील- [९४२३३००४७५]
व अनिल कलकुटकी
-[८००७८२९२००]
या व्हॉट्सॲप क्रमांकावर दिनांक ५ ऑक्टोबर पर्यंत पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

