Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने समूह संवाद स्पर्धा उत्साहात


गडहिंग्लज
(प्रतिनिधी) :
येथील शिवराज महाविद्यालयात हिंदी विभाग व नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'हिंदी राष्ट्रभाषा क्यों' या विषयावर आयोजित 'समूह संवाद स्पर्धा' उत्साहात पार पडल्या. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्र गडहिंग्लजच्या समन्वयक वैष्णवी भालवणीकर तर प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.एन.बी.ईकिले यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी वैष्णवी भालवणीकर, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी समूह संवाद स्पर्धेतील अनुक्रमे विजेते -प्रथम- रविना युवराज करमे, व्दितीय- साक्षी राजेश मोहिते, तृतीय-दुंडया दयानंद स्वामी आदी विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले

यावेळी प्रा.पौर्णिमा कुराडे, मराठी विभाग प्रमुख डॉ.मनमोहन राजे, डॉ.आर.पी.हेंडगे, प्रा.डी.यु.जाधव, डॉ.श्रद्धा पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.अशोक मोरमारे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संतोष माने यांनी केले तर आभार जयंत बोबडे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.