
गडहिंग्लज : घटस्थापना निमित्त शहरातून काढण्यात आलेली मंगल कलश मिरवणूक.
(छाया: मज्जिद किल्लेदार )
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.
घटस्थापना निमित्त गडहिंग्लजमध्ये नदी घाटावर सुवासिनी यांच्या हस्ते मंगल कलशांचे पूजन करण्यात आले. सुवासिनींची ही मंगल कलश मिरवणूक शहरातील नेहरू चौक, लक्ष्मी चौक, मुख्य रस्त्यावरून वीरशैव बँक चौक ते बाजारपेठेतून महालक्ष्मी मंदिरात आणण्यात आली.
मंदिरात महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. या मंगल कलश मिरवणुकीत शहरातील विविध मान्यवरांसह भक्त व सुवासिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कलश मिरवणुकीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
गडहिंग्लज शहरातील वातावरण मंगलमय....







