दसरा सप्ताहास उत्साहात प्रारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): किल्ले सामानगड येथील भिमशाप्पा मठात भक्तांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.
हसुरसासगिरी येथील भक्तांच्या हस्ते विना पूजन करण्यात आले. पंचक्रोशीतील भक्तांच्या उपस्थितीत मठात घटस्थापना करण्यात आली. हसुरसासगिरी ग्रामस्थांनी पहिला पहारा दिला. रात्री दहा ते सकाळी पाच पर्यंत भजनाचा कार्यक्रम झाला.
श्री.भिमशाप्पा मठ येथे काल दिनांक २५ सप्टेंबर पासून दसरा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. दररोज होणाऱ्या या कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठातर्फे भिमशाप्पा दिवटी यांनी केले आहे.




