गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाचे रजिस्ट्रार संतोष शहापूरकर यांची महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन रजिस्ट्रार असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने संतोष शहापूरकर यांचा सत्कार करण्यात आला. ही निवड नुकत्याच रजिस्ट्रार असोसिएशनच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत करण्यात आली.
रजिस्ट्रार संतोष शहापूरकर यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचे प्रोत्साहन व संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
संतोष शहापूरकर यांचे गेल्या पंचवीस वर्षात प्रशासकीय कामकाजातील अनुभव तसेच विविध कार्यकारणी कमिटीवर केलेल्या अनुभवाच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष नवीन अग्रवाल, गणेश साठे, रवींद्र भोसले, राजू गायकवाड, किशनराव साबळे, सरचिटणीस डॉ. दर्शन जोशी- गांधी, खजिनदार अभिनंदन शहा, सहचिटणीस विजय मोरे तर गजानन पाठक यांची प्रमुख सल्लागार म्हणून निवड झाली. यावेळी कोल्हापूर विभागीय अध्यक्ष म्हणून व्ही.सी.जोंदाळ यांची निवड झाली. यासह अन्य विभागीय अध्यक्ष निवडण्यात आले. ऑनलाईन बैठकीत सर्व निवडी एकमताने पार पडल्या.

