Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बसर्गेच्या पाटोळे परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी

🔘कै.मारूती राणोजी पाटोळे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी धनादेश प्रदान 

🔘विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात

 गडहिंग्लज : बसर्गे येथील पाटोळे परिवाराकडून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मदतीसाठी गडहिंग्लज तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आनंद बांदेकर यांच्याकडे  धनादेश प्रदान करताना.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
बसर्गे (तालुका गडहिंग्लज) येथील कै. मारुती राणोजी पाटोळे यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मदतीसाठी धनादेश पाटोळे परिवाराकडून गडहिंग्लज तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आनंद बांदेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

 कै.मारुती राणोजी पाटोळे यांच्या नावाने त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती ताराबाई मारुती पाटोळे व त्यांच्या परिवाराने गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामीण भागातून शिष्यवृत्तीधारक बनणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये ठेवीच्या व्याजातून येणाऱ्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यासाठी हा धनादेश गडहिंग्लज तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आनंद बांदेकर  यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी चिरंजीव बबनराव पाटोळे व नातू शुभंम पाटोळे उपस्थित होते. पाटोळे परिवाराने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मदतीच्या रूपाने आर्थिक पाठबळ देत एक चांगला आदर्श घालून दिल्याबद्दल  त्यांचे कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.