Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांना अभिवादन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी बोलताना प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, खासदार बाळासाहेब माने हे अत्यंत धडाडीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या धडाडी कार्यातून आमच्या संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. समाजहिताच्या कोणत्याही कार्याला नेहमीच सहकार्य करणारे असे व्यक्तिमत्व म्हणून खासदार माने यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करून समाजाशी ऋणानुबंध जपले होते. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे आवाहन प्रा. कुराडे यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनीही आपल्या मार्गदर्शनातून खासदार बाळासाहेब माने यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.