Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगावात रक्तदान शिबिर व होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
भडगावात नवरात्र उत्सव निमित्त रक्तदान शिबिर व होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

भडगाव  येथील संयुक्त महालक्ष्मी व बाळूमामा चौक मित्र मंडळ मार्फत नवरात्र उत्सव निमित्त अण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक, गडहिंग्लज यांच्याकडून शनिवारी सकाळी श्री महालक्ष्मी मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या  शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रसाद सभासद व प्रतीक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी  मंडळामार्फत  गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

रविवारी सायंकाळी सात वाजता होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस होम मिनिस्टरचे प्रवक्ते अरुण पाटील व त्यांचे सहकारी केंपाना कांबळे, तेजस पाटील व आकाश हत्तरगी यांचे स्वागत करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

होमनिस्टर खेळामध्ये लिंबू चमचा व पोत्यात पाय घालून पळणे, उखाणे घेणे, तळ्यात मळ्यात, इस्की टोपी उसके सर असे विविध खेळ घेण्यात आले. या होम मिनिस्टर खेळात पैठणीचे मानकरी ठरलेल्यामध्ये प्रथम क्रमांक रेशमा दयानंद नाईक, द्वितीय क्रमांक वैशाली कलगोंडा पाटील, तृतीय क्रमांक रंजना भूषण चराटी, चतुर्थ क्रमांक आदिलक्ष्मी केतन कोरे यांचा समावेश आहे.

या सदर होम मिनिस्टर खेळामध्ये 42 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर आरोग्य सेवा पुरविणाऱ्या आशा सेविकांचा मंडळामार्फत सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर,  विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष व पोलीस पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रम गावात प्रथमच झाल्याने गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 संयुक्त महालक्ष्मी व बाळूमामा चौक मित्र मंडळ,भडगाव यांच्या वतीने  उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.