गडहिंग्लज (प्रतिनिधी): कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया स्पर्धा व हादगा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हादगा खेळात नर्सरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थिनीनी सहभाग नोंदविला होता. सर्व विद्यार्थिनींनी खिरापतीचा प्रसाद आणला होता.
सहायक शिक्षिका सौ. विमल पाटील यांनी हादग्याची गाणी गायली. सौ. शर्मिला धबाले यांनीही जुनी हादग्याची गाणी गायली. नंतर एकत्र केलेला खिरापतीचा प्रसाद सर्वांना वाटप करण्यात आला. त्यानंतर नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया स्पर्धा पालकांसाठी घेण्यात आली.
शाळेतील सर्व नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनीनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून दांडियामध्ये सहभाग नोंदविला. अत्यंत आनंदी वातावरणात पालक व विद्यार्थ्यांनी दांडियाचा मनमुराद आनंद लुटला.
सदर उपक्रमासाठी मुख्याध्यापक सौ. गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी सौ. विमल पाटील, सौ. निर्मला बारदेस्कर, सौ. पूजा देसाई, सौ. अनिता घुगरे, सौ.शर्मिला धबाले, सौ.शमीना नदाफ, श्रावण कांबळे, सौ. स्मितल कोरडे, सौ. वेरोनिका बारदेस्कर, मनोहर पोवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व पालकांना प्रमाणपत्र देण्यात आले.






