Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात फूड सायन्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय 'कॉफी डे' साजरा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय 'कॉफी डे' फुड सायन्स विभागाच्यावतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक फूड सायन्स विभागाचे प्रमुख, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर आदाटे यांनी केले. या कार्यक्रमात सायन्सच्या विद्यार्थ्यांमार्फत कॉपी बाबत सविस्तर माहितीवर आधारित भित्तीपत्रक तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कॉपी बद्दल विविध उपयुक्त माहिती, कॉफीचा इतिहास, त्याचे विविध प्रकार, प्रोसेसिंग, विविध ब्रँड आदी विषयांवरील भित्तिपत्रक बनवले आहे. यासाठी फुड सायन्स विभागाच्यावतीने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे  यांनी आजच्या घडीला असे उपक्रम राबविले पाहिजेत. यातून नवीन माहिती व नवे संशोधन करण्याला गती येते. यातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढीस लागते आणि आपण चांगले करीत आहोत याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपण घेत असलेल्या 'ब्लॅक कॉफी' चे महत्व  सांगितले.

कार्यक्रमास प्रा. विक्रम शिंदे, डॉ. व्ही. एम.देशमुख, प्रा. संकेत पाटील, प्रा. गौरव पाटील, प्रा. एस. आर. मिसाळ, प्रा. आर.पी. काळगे, प्रा. ए. व्ही. आरभावी, प्रा.एस. ए. पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी.ए.काझी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.