गडहिंग्लज (प्रतिनिधी): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिंदे- फडणवीस सरकारने दिवाळी रेशन किट वाटप करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात सर्वप्रथम नौकूड गावात वाटप करण्यात आले. या रेशनकिट वाटपाचा पहिला मान नौकुड गावाला मिळाल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात आले.
या रेशन किटमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ व एक लिटर पामतेल तेलाचा समावेश आहे.
या रेशनकिट वाटपवेळी नौकुड गावचे सरपंच शुक्राचार्य सुभाना चोथे, हलकर्णी भागाचे मंडल अधिकारी विजय कामत, रेशन दुकानदार महेश मगदुम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, संभाजी चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाने तालुक्याच्या पूर्व भागातून रेशन किट वाटपाचा पहिला मान नौकुड गावाला दिल्याबद्दल सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी महाराष्ट्र शासन व रेशन दुकानदार यांचे आभार मानले.

