Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिरोडा येथे समुद्रात बुडणाऱ्या गडहिंग्लजच्या दोन महिलांना वाचविण्यात यश

वेंगुर्ला: शिरोडा वेळागर समुद्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या गडहिंग्लज येथील दोन महिला पर्यटकांना येथील लाईफ गार्ड संजय नार्वेकर यांच्या प्रसंगावधानामुळे वाचविण्यात यश आले. ही घटना आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. लाईफ गार्ड नार्वेकर यांच्यामुळे या दोन्ही महिलांना जीवदान मिळाले आहे. 

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी त्या दोन्हीही महिला शिरोडा येथे आल्या होत्या. वेळागर समुद्रकिनारी आल्यानंतर अंघोळ करण्यासाठी त्या पाण्यात गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात बुडू लागल्या. हे लाईफ गार्ड संजय नार्वेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत  पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या त्या दोन्ही महिलांना सुखरूपपणे बाहेर काढले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.