Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

                                      (छायाचित्र: मज्जिद  किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही. चौगुले यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.बी. एम. जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संस्थेच्या  संचालकपदी निवड झाल्याबद्दल सचिन शिंदे यांचा सत्कार सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांचा  गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  डॉ. बी. एम. जाधव म्हणाले, सध्या नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत. या तंत्रज्ञानाला स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाबरोबर अपडेट राहणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात आपण टिकण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणे ही काळाची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे म्हणाले, शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सानिध्यात राहून आपले करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. आपल्या प्रयत्नाला  नक्कीच यश मिळेल. त्यासाठी कष्ट व मेहनत घेण्याची तयारी विद्यार्थ्यांच्या असली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक ए.डी लांबोरे ( पिंपळगाव ), एस. एस. कांबळे ( उत्तुर ), संदीप तोरस्कर ( अरळगुंडी ) आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोजीमाशी संस्थेचे संचालक सचिन शिंदे यांनी आपल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अक्षता सुतार, अनुराधा रेडेकर, वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास प्रा. सौ.बिनादेवी कुराडे, मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे, मुख्याध्यापक एन. टी. पाटील ( सोलापूर ), संजय भांदुगरे, आनंदा वाघराळकर, जी.डी. पाटील ( बड्याचीवाडी ), राजेश चव्हाण( नंदनवाड) यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया झूटाळ, श्रेया पाटील यांनी केले. आभार प्रा.आशा पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.