7 हून अधिक जण जखमी
वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लागल्या रांगा
बेळगाव(प्रतिनिधी): वंटमुरी घाटात भीषण तिहेरी अपघात घडला असून घाटात तीन कार दुभाजकाला धडकून एका लॉरीवर आदळून पलटी झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या.
पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर हा अपघात झाला. या अपघातात 7 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेळगावच्या पोलीस उपायुक्त पी.व्ही.स्नेहा यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.
