गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्गाच्या कामासाठी कौलगे येथे शेतात सिमेंटचे पूल रोवण्याचे काम गस्ती पथकातील शेतकऱ्यांनी बंद पाडले.
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाचे काम करण्यात येऊ नये असे संघटनेने अधिकाऱ्यांना बजावले आहे. नुकसान भरपाई बाबत योग्य तो निर्णय झाल्याशिवाय महामार्गाचे काम करू न देण्याचा निर्धार बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, यावर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेने गस्ती पथकाची नेमणूक देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर आज कौलगे येथे गस्ती पथकातील संदीप पवार यांच्यासह पथकातील इतरांनी सिमेंटचा पूल रोवताना महामार्गाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. शेतातील पोल रोवण्याचे काम बंद पाडण्यात आले.

