![]() |
| महागाव : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात प्रतिमा पूजन करताना डॉ. ज्ञानराज चिघळीकर. यावेळी उपस्थित प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत, प्रा.संभाजी चव्हाण. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज इंजिनियरिंग महाविद्यालय व रूरल पॉलिटेक्निकमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून तंत्रशिक्षण संचलनालय पुणेचे संचालक मारुती जाधव व प्रा.डॉ. ज्ञानराज चिघळीकर हे उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत, प्रा.डी.बी.केस्ती यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान, भारतीय संविधानाचे वाचन करुन भारतीय संविधानातील महत्त्वाच्या बाबी सांगितल्या.
![]() |
| महागाव : तंत्रशिक्षणचे संचालक मारुती जाधव यांचे स्वागत करताना प्रा. डी. बी. केस्ती. शेजारी प्रा. आर. एस. पाटील व मान्यवर. |
यावेळी प्रा.आर.एस. पाटील, प्रा.संभाजी चव्हाण, प्रा.आर.सी.कोरी, प्रा.अजित मगदूम, प्रा.रुपाली बांदेकर यांच्यासह पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


