मोफत महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रुग्णांना विविध आजारावरील उपचारात पन्नास ते सत्तर टक्के सवलत दिली होती. विशेषतः नेत्र, आयुर्वेद व पंचकर्म, जनरल मेडिसीन विभागाला रुग्णांची गर्दी लक्षणिय होती. दरम्यान मलिग्रे (ता.आजरा) या आरोग्य केंद्रातील आशा कर्मचाऱ्यांना प्राथमिक 'आरोग्य समस्या व उपाययोजना' तसेच कॕन्सर जनजागृती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते धन्वतंरी मुर्तीचे पुजन करण्यात आले.
संस्थाध्यक्ष ॲड.चव्हाण म्हणाले, ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अद्यावत रुग्णालयांमध्ये लहानात लहान आजारापासून ते कॅन्सर रोगापर्यंत सर्व उपचार एकाच छताखाली उपलब्ध केला आहे. आयुर्वेद व मॉडर्न उपचाराचा सांगड घालून या रुग्णालयात वर्षभरात हजारो रुग्णांनी उपचार घेऊन आनंदी जीवन जगत आहेत. यापुढेही अत्यल्प दरात अत्याधुनिक उपचार देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण ,डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ.एस.जी. किल्लेदार, डॉ. एस. एच. सावंत, प्रा. डी.बी.केस्ती, डॉ.अन्सार पटेल, डॉ.माधव पताडे, डॉ. राजदीप होडगे, डॉ. प्रीती पाटील, डॉ.भगवान यासह विविध विभागातील डॉक्टर्स, परिचारीका उपस्थित होते.

