Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील महाराष्ट्र प्रशासकीय सेवा (एमपीएससी) महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त नायब तहसीलदार लक्ष्मण पाटील होते. यावेळी सौ. विशाखा आनंद पाटील, प्राचार्या गंगाली पाटील उपस्थित होते. 

यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी संविधानाचे महत्व सांगून सर्व हक्क व कर्तव्ये  सांगितली. भारत हा लोकशाहीप्रधान देश असून सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असून सर्व विद्यार्थ्यांनी आपले मतदान कार्ड काढण्याचे आवाहन केले. सौ. विशाखा  पाटील, प्रा. कांबळे, प्रा. रणदिवे, प्रा. पोवार, प्रा. शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वैष्णवी पाटील, स्वाती खांडेकर, निकिता सुतार, स्नेहल नावलगी, शुभम येसणे, श्रीनिवास दंडवते या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संविधान विषयीच्या भित्तीपत्रकांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आभार वैष्णवी पाटील हिने मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.