Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन' च्या विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवत्ता यादीत यश संपादित करीत उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी  कायम राखली आहे.

यामध्ये अंतीम वर्षातील विद्यार्थिनी रोहिणी कोडोली यांनी (9.03) ग्रेड मिळवून चतुर्थ तर महादेवी मोळदी या विद्यार्थिनीने  (8.93) ग्रेड मिळवून शिवाजी विद्यापीठात दहावा क्रमांक मिळविला आहे.

महाविद्यालयातून उत्कृष्ट औषधनिर्माता तयार व्हावा यासाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक, सुसज्ज प्रयोगशाळा,सराव चाचण्या, आवातंर ज्ञान,संशोधनात्मक नवीन उपक्रम राबवत आहोत यामुळेच येथील विद्यार्थी परिपुर्ण होवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत दरवर्षी आपले स्थान निर्माण करीत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस.जी.किल्लेदार यांनी दिली .

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थाध्यक्ष अॕड.आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी अभिनंदन करुन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासाठी  प्राचार्य डॉ.एस.जी.किल्लेदार व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.