Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इंद्रधनुष्य युवा महोत्सवात 'शिवराज'च्या हिना बुड्डणावरचे यश


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सवात येथील शिवराज महाविद्यालयाची एम.ए. भाग दोनची विद्यार्थिनी हिना बुड्डणावर हिने स्पॉट पेंटिंग आणि कोलाज मेकिंग या कला प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला. शिवाजी विद्यापीठाच्या यापूर्वीच्या सलग तीन युवा महोत्सवामध्ये हिनाने आपल्या कलेचा करिष्मा दाखविला आहे.

महाविद्यालयाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. हिनाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांचे प्रोत्साहन तर पदव्युत्तर विभाग  प्रमुख डॉ. सुधीर मुंज, प्रा.रवी खोत यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.