गडहिंग्लजला वडरगे रोडवरील मांगलेवाडी कोपऱ्यावरील नागरिक धुळीमुळे हैराण
तब्बल आठ महिने झाले सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम रखडले
वारंवार नागरिकांनी लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप
तातडीने काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा दिला इशारा
![]() |
| गडहिंग्लज: वडरगे रोडवरील मांगलेवाडी कोपऱ्यावर रस्त्याचे काम रखडल्याने धूळ बसवण्यासाठी असा पाण्याचा फवारा मारावा लागतो. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील वडरगे रोडवरील मांगलेवाडी कोपरा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम तब्बल आठ महिने झाले रखडल्याने या परिसरातील रहिवाशी नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी वारंवार संबंधित विभागाचे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, युवा नेते संतोष मांगले व माजी नगरसेवक बाळासाहेब वडर यांच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी बांधकाम विभागाला आज पुन्हा निवेदन देऊन त्याकडे लक्ष वेधले असून याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज येथील वडरगे रोडवरील मांगलेवाडी कोपरा येथे सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम तब्बल आठ महिने झाले रखडले आहे. वारंवार यासंबंधी तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकही हतबल झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम हद्दीत डांबरी रस्ता सुस्थितीत होता. मात्र या ठिकाणी पाईपलाईन टाकले गेल्याने ह्या रस्त्याची पुन्हा दैना झाली. गेले दोन वर्षे झाली नगरपालिकेसह प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदन देऊनही याकडे कानाडोळा होत आहे.
![]() |
| गडहिंग्लज: सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना मांगलेवाडी परिसरातील ग्रामस्थ. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
या निवेदनावर संतोष मांगले, मज्जिद किल्लेदार, बाळासाहेब वडर, जयवंत अस्वले, राजू मोहिते, विशाल बारामती, अमर माने, धनंजय मोरबाळे, अमोल घुगरे आदींच्या सह्या आहेत.


