Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर येथील नेहरू युवा केंद्रामार्फत तेरणी येथे स्वच्छता मोहीम

तेरणी : स्वच्छता मोहिमेप्रसंगी सरपंच करवीर उथळे, कोल्हापूर येथील  नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेविका वैष्णवी विश्वनाथ, बाळासाहेब निंबाळकर, ग्रामसेवक निवृत्ती कोंडूस्कर, शिक्षक श्री.अंकली यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व युवा वर्ग.   

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
कोल्हापूर येथील नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत तेरणी ( तालुका गडहिंग्लज) येथे "स्वच्छ भारत 2.0  अभियान" अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेविका वैष्णवी विश्वनाथ यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. युवकांचा यामध्ये लक्षणीय सहभाग होता.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालय परिसराची तसेच गावातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. परिसरात पडलेला कचरा, वाढलेली झाडे- झुडपे हटविण्यात आली. यावेळी स्वयंसेविका वैष्णवी विश्वनाथ यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व सांगत जागृती केली. तसेच स्वच्छता शपथही घेण्यात आली.

यावेळी सरपंच करवीर उथळे, ग्रामपंचायत सदस्य, नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेविका वैष्णवी विश्वनाथ, बाळासाहेब निंबाळकर, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर, कर्मचारी सुरेश भोई, रेहमान तशिलदार, शिक्षक श्री.अंकली, ऋषिकेश मांगले, बालगोपाल तरुण मंडळाचे पदाधिकारी, युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.



 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.